पशुधनावर आधारीत शेळी पालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 08 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, ही उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असुन या संस्थेचा मुख्य उददेश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना, स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र गडचिरोली द्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता गडचिरोली येथे दि. 14 जुन 2021 ते 24 जुन 2021 (दोन आठवडे) कालावधीचे ऑनलाईन “शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबडयांची विविध
जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी त्वरीत दि. 13 जुन 2021
पर्यंत ‘महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र,एमआयडीसी रोड गडचिरोली येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे.
अधिक माहितीसाठी
श्री. के.व्ही. राठोड, प्रकल्प अधिकारी,
मो. न. 9403078773, 07172-274416
व वनश्री रामटेके, कार्यक्रम आयोजक,
मो. नं. 8329963693. यांच्याशी संपर्क साधावा.
हे देखील वाचा :
गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 64 कोरोनामुक्त, तर 57 नवीन कोरोना बाधित
Comments are closed.