Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरी येथे १०० व्या जन्मलेल्या कन्येचे स्वागत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली :  दिनांक १०/१०/२०२४ ला मौजा हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना चालू झाल्यापासून आत्ता पर्यंत १०० महिलांच्या डिलिव्हरी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यात. त्या निमित्याने आज १०० व्या जन्मलेल्या कन्येचे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरीच्या वतीने श्री प्रभाकरण MD lloyds च्या हस्ते चांदीची नानी देवून व बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले.         सोबतच दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झालेल्या सर्व महिलांना बेबी किड्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दवाखान्यात शंभर डिलिव्हरी करिता योगदान दिलेल्या, डॉ.प्रिती बुरीवार, डॉ.स्वाती रेड्डी, डॉ.श्री.उमेश उत्तरवार, डॉ.श्री.चेतन बुरीवार यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. सोबतच तीनही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचव उपस्थित गाव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. अरुणाताई सडमेक सरपंच ग्रा.पं. पुरसलगोंदी,श्री. नेवलुजी पाटील गावडे सरपंच ग्रा.पं.नागुलवाडी, श्री.राजुभाऊ तिम्माउपसरपंच ग्रा.पं. नागुलवाडी,श्री.प्रशांतजी आत्राम उपसरपंच ग्रा.पं.तोंडसा,श्री.साई कुमार, श्री.बलराम सोमनानी,सौ,शितल सोमनानी, श्री.संजय चांगलानी, श्री.सुनील दौंड PSI पोलिस स्टेशन हेडरी, डॉ.श्री.गोपाल रॉय,डॉ.श्री.चेतन बुरीवार, डॉ.प्रिती बुरीवार, श्री. कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी. सौ. कल्पना अलाम माजी सरपंच सुरजागड, श्री.झुरूमासू गोटा गाव पाटील बोटमेटा, श्री. देवाजी पाटील कवडो गाव पाटील हेडरी,सौ. केरकेट्टा मॅडम अंगणवाडी सेविका मंगेर, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगेर, श्री. लचुजी पा. हेडो गाव पाटील हालूर, श्री. फबीयानुस खलको प्रतिष्ठित नागरिक पाली टोला, श्री. साधू गुंडरु गाव पाटील बांडे, श्री. मंगू कलमोटी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, श्री. झुरू कवडो नागरिकहेडरी, श्री. अशोक हिचामी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, श्री बाजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे , श्री. रामजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. समस्त कार्यक्रमाला ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.