Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शबरी आदिवासी महामंडळातर्फे व्यवसायासाठी कर्ज योजना

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसाय करण्याच्या मुळ हेतुने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक अंतर्गत NSTFDC (राष्ट्रिय अनुसुचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली) यांचे धर्तीवर राज्य शासनामार्फत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसाय करण्याच्या मुळ हेतुने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याबाबत शाखा कार्यालय गडचिरोलीसाठी लक्षांक प्राप्त झालेले आहे.

महिला सबलीकरण योजना (२ लक्ष) लाभार्थी संख्या १०, कृषी आणि संलग्न व्यवसाय (५ लक्ष) लाभार्थी संख्या ४. हॉटेल ढाबा व्यवसाय (५ लक्ष) लाभार्थी संख्या ३, ऑटो वर्कशॉप/स्पेअर पार्ट ( ५ लक्ष)लाभार्थी संख्या ३, वाहन व्यवसाय (१० लक्ष) लाभार्थी संख्या २, वाहन व्यवसाय (१० लक्ष पेक्षा जास्त व १५ लक्ष पर्यंत) लाभार्थी संख्या ३, लघु उद्योग व्यवसाय ( ३ लक्ष ) लाभार्थी संख्या २, ऑटोरिक्षा मालवाहू रिक्षा (३ लक्ष) लाभार्थी संख्या २ आहे. सदर योजनेचा लाभ गरजु आदिवासी सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी यांनी घ्यावा. असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापक यांनी केलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

9 ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.