Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोलापुरात पाच ठिकाणी राज्य सीमेवर नाकाबंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर डेस्क 24 एप्रिल:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.सोलापुर शहर आणि जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमेवर शहर पोलीस दल आणि ग्रामीण पोलीस दलाने नाकाबंदी पॉईंट सुरू केले आहे. परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील नागरिकांना सोलापुरात प्रवेश बंदी लागू केली आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.

विनापरवाना प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई व होम क्वारंटाईनचा शिक्का-
सोलापुरात विना परवाना प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. व तसेच होम क्वारंटाईन केले जात आहे. फक्त वैद्यकीय सेवेसाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या वाहनांना सोडले जात आहे. सोलापूर शहराला लागून असलेल्या हैदराबाद नाका(मुळेगाव), तुळजापूर नाका (लातूर ,उस्मानाबाद महामार्ग), पुणे नाका (पुणे, मुंबई महामार्ग), सोरेगाव(विजापुर कर्नाटक महामार्ग) आदी ठिकाणी पोलिसांचे चेक पॉईंट किंवा नाकाबंदी सुरू झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैद्यकीय सेवेसाठी येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश-
मागील काही दिवसापासून सोलापूर सह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. शिवाय मृत्यू दरही वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी शासन विविध स्तरावर उपाययोजना आखत आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी राज्यात जिल्हाबंदी सुरू झाली आहे. कोणत्याही व्यक्तीस विनाकारण प्रवास करण्यास मनाई केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. किंवा वैद्यकीय सेवेसाठी किंवा रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रवेश दिला जात आहे. सोलापुरात 28 ठिकाणी ग्रामीण पोलीस दलाने नाकाबंदी पॉईंट सुरू केले आहेत.

Comments are closed.