राजधानी दिल्लीत पुन्हा लाॅकडाउन! केंद्र सरकारकडे प्रस्ताव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १८ नोव्हेंबर: राजधानी दिल्ली,मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने केंद्र सरकारकडे कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वॅभूमीवर दिल्लीतील कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्याचा प्रस्ताव आहे. नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्ली सरकारने काही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. अशातच दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु दिल्लीत तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केलंय.
दिल्लीतील गर्दीची ठिकाणे अनिच्छीत काळासाठी बंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकार कडुन प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी जी पावले उचलायला हवीत, ती आम्ही उचलतो असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.