Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर

हावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 03 , जानेवारी :-  खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला  वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 03 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.