Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र दिन फक्त जिल्हा मुख्यालयातच होणार साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. २९ एप्रिल: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १ मे रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून फक्त जिल्हा मुख्यालयातच साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन स्तरावरून परिपत्रका द्वारे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र दिन समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आमंत्रितांसाठीच असणार असून सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा मुख्यालय सोडून जिल्ह्यात इतर कुठल्याही कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.