Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्थमंत्र्याच्या उत्तरावर बोलू न दिल्यानं महाविकास आघाडीचा सभात्याग

अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 05 जुले – अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

अतिरिक्त अर्थसंकल्पावरील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने आज विरोधी पक्षाने सभात्याग केला.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी श्री.वडेट्टीवार यांनी सवांद साधला त्यावेळी ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ घेतला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात आकडे फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे. कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या २०२३- २४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. मागास वर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत आहे. सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचं पाप या सरकार कडून होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर एक रुपया खर्च झाला नाही. बोलाचा भात अन बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करता येत नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. जवळपास मुंबईतील १३ मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा घाट घातला. त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासननिर्णय काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे.अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.