Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महावितरणच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील 242 कोटी 90 लाखाच्या घरातवसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर  व  गडचिरोली 9 फेब्रुवारी :- महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात – चंद्रपूर व गडचिरोली  जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक,  औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात राबविण्यात येतआहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी वसुली कामात गुंतले आहेत. ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी  सुट्टीच्या दिवशीही सर्वाना वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे.

ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा वीजदेयकभरल्यास वेळ व श्रमाची बचत होईलच सोबतच ०.२५ % डिजीटल पेमेंट सुट पण मिळेल. वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून थकबाकी वेळेत भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे. चंद्रपूर  परिमंडळात (चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा एक‍त्र‍ित )चालू  वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत  मागणीपैकी घरगुती  ग्राहकांकडुन  १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी  १२ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन  ६ कोटी ६३ लाख थकबाकी वसुली येणे आहे,  ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख तर  ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८  कोटी ३१ लाख  येणे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील ग्राहक निहाय चालू व मागील वर्षातील एकूण थकबाकीचंद्रपूर जिल्हयातील एकूण थकबाकी १२८ कोटी ९६ लाख ग्राहकांची वर्गवारी  चंद्रपूर जिल्हा – घरगुती -९ कोटी ४२ लाख, वाणिज्य -३कोटी६६लाख ,औद्योगिक-५ कोटी ३८ लाख, पथदिवे -१०५ कोटी ४३लाख, पाणीपुरवठा योजना -३ कोटी १२ इतर व सरकारी कार्यालये -१ कोटी ९४ लाख अशी एकूण- १२८ कोटी ९६ गडचिरोली जिल्हयातील  एकूण थकबाकी ११३ कोटी ९४ लाख  ग्राहकांची वर्गवारी  गडचिरोली ‍जिल्हा – घरगुती – ४ कोटी २५ लाख, वाणिज्य ४६ लाख, औद्योगिक – १ कोटी  ३६, पथदिवे- १०२ कोटी ४७, पाणीपुरवठा योजना -३०लाख, इतर व सरकारी कार्यालये -४ कोटी ६९लाख अशी एकूण- ११३ कोटी ९४ आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.