Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर….

पालघर आणि ठाणे जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये मुसळधार पाऊस होत असून भारतीय हवामान खात्याने.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 14 जुलै :- दिनांक १४ जुलै पर्यंत पालघर आणि १५ जुलै पर्यंत ठाणे जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना दिनांक 14-07-2022 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील ठाणे. जिल्हयातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या (प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना गुरूवार, दि. 14 व 15 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोकणासह महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे.यातच ठाणे व पालघर जिल्ह्यातील जनजीवन मोठ्याप्रमाणात विस्कळित झाले आहे. अनेक नदी नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शिवाय अनेक रस्ते व रस्त्यांवरील पुल पाण्याखाली गेल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान खात्याने पुन्हा अती मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पालघरचे जिल्हाधिकारी तथा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ माणिक गुरसळ आणि ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण राजेश नार्वेकर, ठाणे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व दिनांक 02-08-2019 च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात  आलेल्या अधिकारान्वये पालघर व ठाणे जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.