Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुस्का गावातील दोन दारू विक्रेत्यांवर मालेवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल

20 लिटर दारूसह 6 ड्रम मोहसडवा केला नष्ट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  धानोरा तालुक्यातील मुस्का येथील मुक्तीपथ शक्तीपथ गावसंघटनेच्या महिलांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी गावातून रॅली काढून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले. परंतु दारू विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते.  त्याबाबतची माहिती मिळताच गावातील महिला, पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक मार्गाने  कृती करीत 20 लिटर दारूसह 6 ड्रम मोहसडवा नष्ट  केला. व गावातील दोन दारूविक्रेत्यांवर मालेवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुस्का येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीच्या समस्येवर मुक्तीपथ व शक्तीपथच्या महिलांची बैठक मुक्तिपथ तालुका टीमच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी  गावातील दारुसंबधी समस्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य महिला सहभागी होऊन दारुविषयी अडचणी मांडल्या. आमचे नवरे, मुलं सकाळी उठल्यापासुन दारूचे व्यसन करतात. कमी वयातील मुलं या आहारी जाऊन घरात भांडण करतात, शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच  गावातील वातावरण बिघडले अशा प्रकारच्या अडचणी सांगितल्या. त्यामुळे मुक्तिपथ तालुका टीमने महिलांना गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी सल्ला दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानुसार नियोजन करण्याचे महिलांना सांगण्यात आले. नियोजनानुसार महिलांनी गावात दारूबंदीचे नारे देत रॅली काढण्यात आली व दारू विक्रेत्याला भेट देऊन तंबी देण्यात आली. परंतु, काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता, याबाबतची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने अहिंसक कृती केली. यावेळी दारूविक्रेत्यांकडे मिळून आलेला  20 लिटर दारू, 6 ड्रम मोह सडवा व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे गावातील विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी पोलीस पाटील यांच्या नेतृत्वात महिलांनी लढा सुरु केला आहे. यावेळी, गावातील शक्तिपथ संघटनेच्या महिला, मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकार, भाष्कर कड्यामी, मुक्तीपथ कार्यकर्ती बुधाताई पोरटे, शीतल गुरनुले उपस्थित होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.