Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी, स्टँड अप इंडिया योजना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 13,ऑक्टोबर :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक मासाका-दिनांक 8 मार्च, २०१९ अन्वये केंद्रशासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front End Subsidy १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दि ९ डिसेंबर २०२०अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत.सदर चा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.सदर योजनेकरिता इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत एकरा(बु) येथे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लाखो रूपयाचे विकास कामचे भूमिपूजन व लोकार्पण सोहड़ा संपन्न..!!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.