Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन

4000 कामगारांची उपस्थिती....

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : केंद सरकारच्या कामगार विरोधी चार श्रमसंहिताच्या विरोधात आज देशभर एक दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली होती. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन परीचर कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर यांनी या धोरणाचा निषेध केला व जर सरकारने हे कामगार विरोधी कायदे मागे घेतले नाही तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.

केंद सरकार जनतेच्या, कामगारांच्या हिताचे कायदे न करता भांडवलदार व कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी काम करत आहे असा आरोप सीटु,आयटक व किसान सभेच्या नेत्यांनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड. रमेशचंद्र दहिवडे,कॉ. डॉ.महेश कोपुलवार, कॉ. अमोल मारकवार,कॉ. देवराव चवळे, यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हण वाडे,सतीश विधाते, रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक बाळुभाऊ टेबुर्ने,आजाद पक्षाचे राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, कर्मचारी संघटनेचे उमेशचंद्र चिलबुले, मनोहभाऊ पोरेटी, वामनराव सावसागडे,चडगुलवार, डॉ. धर्मराज सोरदे इत्यादीनी पाठिंबा दिला.

या आंदोलनात चार श्रमसंहिता रद्द करण्यात यावे, 29 कामगार कायदे लागू करण्यात यावे,जी राम जी कायद रद्द करण्यात यावे, योजना कर्मचाऱ्यांना किमान 26000/- रुपये वेतन देण्यात यावे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी,ठेका पध्दती बंद करण्यात यावे,60 वर्षा वरील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना तसेच सर्व शेतकरी शेतमजूर यांना मासीक 10000/- दहा हजार पेन्शन देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.