Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची दीक्षाभूमि स्मृति भवनाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. २० फेब्रुवारी: राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगावर महाराष्ट्रातुन एकमेव सदस्य म्हणून नागपुरातील सुभाष पारधी यांची महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी नियुक्ति केली आहे. नियुक्ति नंतर प्रथमच आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज नागपुरात दाखल होत दीक्षाभूमि, संघ स्मृति मंदिर आणि चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति संग्राहालयाला भेट दिली. तसेच अनुसूचित जाति च्या विविध संस्था, संघटनांशी त्यांनी यावेळी चर्चा केली. आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दीक्षाभूमि वर जाउन डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. येत्या 22 फेब्रूवारी ला नागपुर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि पोलिस आयुक्त यांचासोबत बैठक घेणार असून या बैठकीत अनिसुचित जाती च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे असलेले प्रलंबित समस्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. 16 फेब्रूवारी ला राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांचा स्वाक्षरीने राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे गठन करण्यात आले असून आयोगाचे अध्यक्ष म्हणून विजय सांपला यांची नियुक्ति करण्यात आली असून अरुण हालदार उपाध्यक्ष तर सदस्य म्हणून अंजू बाला आणि सुभाष पारधी यांची नियुक्ति राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.