लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी पासून थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने थंडीच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. बुधवारी नागपूरचे किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअसची नोंद करीत थंडीने जोरदार पुनरागमन केले. तर गुरुवारचे किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, विदर्भातील नागपूरमध्ये सर्वात जास्त थंडी होती.
गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट असल्याने बुधवारी सायंकाळपासून नागपूरकरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केलाअसून गुरुवार पासून त्यात शेकोटीचीही भर पडली आहे.. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी चौकांमध्ये शेकोटया पेटवून अनेकजण शेकत होते.
मागील महिन्यात अधिवेशनाच्या कालावधीत 15 डिसेंबर रोजी किमान तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. या वर्षातील सर्वाधिक कमी तापमान होते. तसेच येत्या एक दोन दिवसांत अजून कमी तापमान होण्याची शक्यता असल्याने या मोसमातील किमान तापमानाचा विक्रम मागे पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा थंडीची लाट वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे.
हे ही वाचा,
नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !
गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन
Comments are closed.