Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांची टसर रेशीम केंद्रास भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

टसर रेशीम उत्पादन वाढिला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दिल्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.10 : राज्याचे वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकिय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांनी गडचिरोली आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी टसर रेशीम केंद्रातील टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला टसर रेशीम उत्पादनाला चालना देवून ढिवर व आदिवासी वर्गाच्या उदरनिर्वाह व्यवसायाला चालना द्या अशा सूचना केल्या. आरमोरी येथील रेशीम केंद्रावर सात एकरांमध्ये कार्यालय परिसरात टसर रेशीम केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या रेशीम केंद्राच्या अंतर्गत जिल्ह्यातील 400 हेक्टर वन क्षेत्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात रेशीमची निर्मिती केली जाते. यावेळी राज्यमंत्री यांनी टसर रेशीमची प्रक्रिया जाणून घेतली व टसर रेशीम कापडाला भरपूर मागणी असल्यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे असे मत व्यक्त केले. टसर कोष उत्पादन तसेच टसर सूत उत्पादन आणि तसेच कापड उत्पादन इत्यादी प्रक्रियेमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे त्यामुळे जिल्ह्यातील टसर कोष उत्पादन वाढीवर भर देऊन गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर तसेच आदिवासी समाजातील जास्तीत जास्त कुटुंबांना याचा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टसर लाभार्थीचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून काही अल्पभूधारक आहे. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून ते टसर कोष उत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून तसेच रेशीम उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने, उद्योग व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात यासाठी शासन आवश्यकतेनुसार आपणाला मदत करेल असे आश्वासन यावेळी राज्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला दिले. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी टसर रेशीम सूत निर्मिती प्रशिक्षण केंद्र तसेच टसर कोष निर्मिती प्रक्रिया, रेशीम यंत्र पाहणी करून याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रीलींग बंदा कोष, चलपट कोष, दुदरू कोष या मधील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली. या ठिकाणी उपस्थित टसर रेशीम कर्मचारी यांच्याशी संवादही साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.व्ही.आव्हाड, अशोक विसपुते, स्वीय सहायक सचिन बडवे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.