Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चवेला आरोग्य मेळाव्यात 250 हून अधिक नागरिकांची तपासणी गणेशोत्सवात आरोग्याचा सामाजिक महापर्व

गणेशोत्सव सण साजरा करताना समाजोपयोगी उपक्रमांद्वारे आरोग्य व जनजागृतीचा संदेश देण्याचा हा प्रयत्न ठरला. उत्सवातून एकोप्याचा, सेवा भावाचा आणि सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट नमुना चवेला गावाने साकारला....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा : तालुक्यातील उपकेंद्र चवेला येथे गणेशोत्सव महोत्सवानिमित्त २ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश दहिफळे (THO, धानोरा) व मा. डॉ. कुणाल मोडक (MO, PHC गोडलवही) यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात तब्बल २५० हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित रुग्णांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.

या मेळाव्यात क्षयरोग निदान मोहिमेअंतर्गत १०६ संशयित रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले, ८० जणांची रक्त तपासणी झाली, ३० नागरिकांना गोल्डन कार्ड वितरीत करण्यात आले, तर २० जणांचे थुंकी नमुने घेण्यात आले. तसेच नागरिकांना क्षयरोग, हिवताप, डेंग्यू आणि संसर्गजन्य आजारांविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मेळाव्याला डॉ. दहिफळे, डॉ. मोडक, डॉ. कन्नाके (MMO), भडके (LSO), गिरीष लेनगुरे (STS), अनिल शंखावार (MTS), रकीम शाह (HI), पल्लवी वायरे (LT), सदाशिव मंडावार व श्रीकांत कोडापे (MPW), सूरज गेडाम (SFW), गटप्रवर्तक, आशा व अन्य आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.