Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुक्तिपथचे तालुका व्यसन उपचार शिबीर क्लिनिक रुग्णांसाठी ठरताहे वरदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 25 ऑगस्ट : दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांसाठी मुक्तिपथतर्फे प्रत्येक तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी सुरु असलेल्या तालुका क्लिनिक वरदान ठरत आहे. या आठवडण्यात विविध पाच तालुक्यातील ५१ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व अतिदुर्गम जिल्हा म्हणून परिचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियानाने गाव पातळीवर व्यसन उपचार शिबीर व व्यसन उपचार तालुका क्लिनिक सुरु केले आहे. प्रत्येक तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी क्लिनिक घेतली जाते. या क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना योग्य समुपदेशनासह औषधोपचार सुद्धा केले जाते. आतापर्यंत अनेकांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेऊन दारूचे व्यसन सोडले आहे. या आठवडण्यात देसाईगंज क्लिनिकमध्ये १३, सिरोंचा १२ , मुलचेरा १२ , अहेरी ६ व कुरखेडा ८ अशा एकूण ५१ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.