‘‘नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते उदघाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली, जिल्हा प्रशासन, गडचिरोली, जिल्हा परिषद, गडचिरोली, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली, जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ मार्च २०२५ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे ‘‘नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावर दोन दिवसीय मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनायक जोशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर.आर. पाटील, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत उपस्थित राहणार आहेत.
‘‘नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील प्रदर्शन दिनांक ४ मार्च २०२५ ते ५ मार्च २०२५ दोन दिवस चालणार असून नागरीकांसाठी निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. सदर प्रदर्शनात भारत सरकारद्वारे १ जुलै २०२४ पासून लागू केलेल्या नवीन कायद्या विषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.