मुरुमगाव यांनी जप्त केला 138 किलो 580 ग्रॅम गांजा एकुण 20,98,800/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 11 सप्टेंबर : मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 मध्ये गांजा हे मादक पदार्थ बाळगुन छत्तीसगड राज्यातुन सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे येत आहेत. त्यावरुन मुरमगाव ता.धानोरा, जि गडचिरोली येथील कटेझरी जाणारा रोड समोरील बस स्थानकासमोर सापळा लावुन सदर कारला हात दाखवुन थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये पिवळया रंगाची चुंगळी, सिल्वर रंगाची चुंगळी, पांढया रंगाची चुंगळी असे 03 चुंगळयामध्ये एकुण 138 किलो 580 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत 13,85,800/- मिळुन आल्याने सदर गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन सिल्वर रंगाची होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 किंमत 7,00000/- तसेच दोन आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत 13,000/-असे एकुण किंमत 20,98,800/-रुपयेचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे आणुन आरोपी नामे 1) उमर फैय्याज अहमद शेख, वय 28 वर्ष, व्यवसाय – वाहन चालक, रा.कमला रमननगर बेंगनवाडी जवळ रजा चौक गोपाल इलेक्ट्रेशन गोवंडी मुंबई-43, 2)राकेश राजु वरपेटी, वय-26वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. सिघ्दार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुबंई-43, 3) शहबाज सरवर खान, वय-27 वर्ष, व्यवसाय-वाहन चालक, रा. बिहॉयंन्डीग बिल्डींग नंबर-53 जवळ आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबुर मुंबई-71 यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2023 ते आतापर्यंत एकुण 416 किलो 359 ग्रॅम अंदाजे 51,91,480/- रु. किंमतीचा गांजा जप्त करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोमके मुरुमगावचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट हे करीत आहेत.
हे पण वाचा :-


Comments are closed.