Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मृत्यूच्या तांडवाने नांदेड हादरले, दररोज वाढतोय मृत्यूचा आकडा

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • नांदेडमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी अपुरी
  • कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगा
  • सहा तासात २३ जणांवर अंत्यसंस्कार, १३ मृतदेह अंत्यसंस्कार करण्याच्या प्रतीक्षेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. १० एप्रिल: नांदेड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट थरकाप उडवणारी आहे, दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा वाढताना दिसतो आहे, दिवसागणिक १२०० ते १४०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा शुक्रवारी एक हजाराचा आकडा पार झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे राैद्ररूप सध्या नांदेडकर अनुभवत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ मृतदेहावर नांदेड येथील गाेवर्धनघाट स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी १३ मृतदेह प्रतीक्षेत (Waiting) होते. स्मशानभुमीतील हे चित्र अंगावर काटा आणणारे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाने झालेल्या मृत्यूचा प्रकोप सध्या वाढताना दिसतो आहे, या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रार्दुभावाचा उद्रेक झाला आहे. विशेषत दुसऱ्या लाटेत मृत्यूदर भयावह असल्याचे दिसून येते. मागील अवघ्या ९ दिवसात या स्मशानभुमीत तब्बल २८० हून अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोमवार ५ एप्रिल रोजी ३६, मंगळवारी ४४,  बुधवारी ४२ तर गुरूवारी २९ जणांवर या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारचे चित्र तर थरकाप उडविणारे होते. सकाळी ८ ते २ या सहा तासांत येथे २३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर १३ मृतदेह प्रतीक्षेत होते. सायंकाळी ७ पर्यंत आणखी काही मृतदेह येतील. अशी माहिती नांदेड मनपाचे क्षेत्रीय अधिकारी विलास गजभारे यांनी दिली आहे.

दरम्यान नांदेड वाघाळा महानगर पालिकेने कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा उभारली आहे. मनपाच्या सहा झोन मधील पथक आलटून-पालटून प्रत्येकी एक आठवडा अंत्यसंस्काराची जबाबदारी सांभाळत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर मृतदेहाला भडाग्नी देणाऱ्या नातेवाईकाला तसेच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हाताळणाऱ्या नातेवाईकाला मनपातर्फे पीपीई कीट देण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.