Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती, तब्बल २२ जणांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.


नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे.

या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दिनांक २१ एप्रिल: राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२.३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.