Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१३ सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची (नॅक) चमू देणार भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 11 सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठात दिनांक १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर असे तीन दिवस राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची चमू भेट देणार आहे. हि चमू गोंडवाना विद्यापीठातील सर्व विभागांना भेट देऊन पाहणी करणार आहे . यासाठी सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली आहे .

का महत्वाचे आहे नॅक मूल्यांकन

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सद्या सर्वच शिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची(नॅक ) मान्यताप्राप्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जर कुठल्याही उच्च शिक्षण संस्थांना नॅक ची मान्यताप्राप्त नसेल तर ती संस्था शासनाच्या अनेक योजना पासून वंचित राहते. यावरून हे लक्षात येते की, नॅक खूप महत्वपूर्ण आहे. तसेच राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना आणि संबंधित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठात दिनांक १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर असे तीन दिवस राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची चमू भेट देणार आहे.

नॅक मूल्याकनासाठी जे निकष आवश्यक असतात त्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रंशात बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच विद्यापीठातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.विद्यापीठ स्थापने पासून प्रथमच कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे नॅक मूल्याकन होत आहे. त्यासाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अविरत कार्यरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नॅक मान्यताचा उद्देश
नॅक ची स्थापना विद्यापीठांमधील पायाभूत सुविधा, सूचना, संशोधन आणि शिक्षण मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आली. ज्या प्रमाणित संस्था सर्व आवश्यकता पूर्ण करतात. त्या सर्वोच्च ग्रेड (A++, A+, A) मिळवतात. नॅक ने विद्यापीठांच्या ग्रेडिंगसाठी जे निकष निश्चित केले आहेत. ते नॅक मान्यतेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत की नाही हे निर्धारित करण्यासाठी ते हे निकष तपासू शकतात. याव्यतिरिक्त, फेडरल आणि राज्य सरकारांद्वारे चालवल्या जाणार्‍या निधी कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्रमाणपत्राद्वारे प्रदान केला जातो.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.