Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 काळाची गरज – नितीन करमळकर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर पुण्यात विचार मंथन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे 7 फेब्रुवारी :- मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षिणक धोरण 2020 हे अतिशय उपयुक्त असून देशाच्या विकासाला चालना देणारे असल्याचे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सुकाणु समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेच्या उद्गघाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले. या परिषदेस देशभरातील शिक्षक, प्राचार्य व संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन लाईफ एज्यकेशन युनीवर्स या शैक्षिणक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते .करमळकर पुढे म्हणाले की
या धोरणाबाबत बरेच गैरसमज निर्माण होत आहेत पण ते चुकीचे आहेत, म्हणजे शिक्षक अतिरिक्त होतील, काम जास्त करावे लागेल यासारखे अनेक प्रश्न आणि गैरसमज तयार होत आहेत पण ते खरे नाही.उलट नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यासह शिक्षकांना ही हे धोरण उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक मनोगतात मुख्य संयोजक नितीन जाधव यांनी या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून या नव्या शैक्षणिक धोरण विषयी शिक्षक, विद्यार्थी व संस्थाचालक सारेच अनभिज्ञ आहेत तसेच स्टार्टअप एज्युकेशन हा नव्या धोरणाचा एक घटक आहे तसेच त्यामुळे या नव्या धोरणाची साधक बाधक माहिती सर्वांना व्हावी यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक व आय.आय. टी दिल्ली चे मार्गदर्शक हरीश चौधरी यांनी या धोरणातील महत्त्वाच्या बाबी सर्वांना विस्तृत पणे समजावून सांगितल्या व हे धोरण नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात असल्याचे मत व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे सदस्य व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शालेय धोरणाविषयी माहिती दिली तसेच हे धोरण नव्या पिढीतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी व आपल्या आवडी नुसार अतिशय उपयुक्त ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेस देशभरातील शिक्षणतज्ञ, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या समितीतील प्रमुख यांना उपस्थित शिक्षक, संस्थाचालक व विद्यार्थी यांनी या नव्या धोरणा बाबत विविध प्रश्न उपस्थित केले त्याला योग्य अशी उत्तरे देऊन या धोरणा विषयी साधक बाधक सविस्तर चर्चा ही करण्यात आली.

या राष्ट्रीय परिषदेस माजी कुलगुरू व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणु समिती चे अध्यक्ष नितीन करमळकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती अभ्यासक व आय.आय. टी दिल्ली चे हरीश चौधरी,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,या परिषदेचे मुख्य संयोजक नितीन जाधव,आमदार विजय गव्हाणे,आय.ई.एस.ए चे अध्यक्ष राजेंद्र सिंग ,शिक्षण तज्ञ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अभय थत्ते यासह देशभरातील शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक,नव्या धोरण समितीचे प्रमुख आणि विविध क्षेत्रातील मार्गदर्शक यांनी या परिषदेला मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परीषदेत स्टार्ट अप शिक्षणाचे प्रात्यक्षिक व लॅब चे प्रदर्शन भरविले होते त्यास फार मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.