Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह विविध स्पर्धांनी साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 2 ऑगस्ट 2023 ; गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात २३ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

या सप्ताहमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ही संकल्पना घेऊन पोस्टर प्रेझेंटेशन, पीपीटी सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थांनी सहभाग घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोस्टर प्रेझेन्टेशन
१. प्रथम क्रमांक
निधी रवी शेंडे (राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्टस् कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय सावली, जिल्हा चंद्रपूर)

२. द्वितीय क्रमांक
मयुरी जी. काळे (हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर)

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

३. तृतीय क्रमांक
यश खुशाल भैसारे (राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्टस् कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय सावली, जिल्हा चंद्रपूर)

पीपीटी सादरीकरण (विद्यार्थी ग्रुप)

१. प्रथम क्रमांक
नेहा प्रधान

२. द्वितीय क्रमांक
निधी रवी शेंडे (राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्टस् कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय सावली, जिल्हा चंद्रपूर)

३. तृतीय क्रमांक
गायत्री विलास भूरसे (हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर)

पीपीटी सादरीकरण (प्राध्यापक ग्रुप)

१. प्रथम क्रमांक
अपर्णा बालाजी धोटे ( नीलकंठ राव शिंदे सायन्स आणि कला, भद्रावती)

२. द्वितीय क्रमांक
स्मीता राऊत(राष्ट्रपिता गांधी आर्टस् कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर)

या स्पर्धांमध्ये संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम आणि रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे यांनी नोडल अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.