Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • डॉ अशोक जीवतोड़े केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ,माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक.
  • राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे याचा पक्ष प्रवेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर दि. १४ जुलै : पूर्व विदर्भात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोग़री पोहचवनारे शिक्षण महर्षी स्वर्गवासी श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांचे ते चिरंजीव आहेत. विदर्भातील व संपूर्ण देशात ओबीसी चठवळ सक्रीय करुन ओबीसीना न्याय देण्याचा व त्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकार कडून मंजुर करण्यासाठी देश भरात विविध राज्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशने घेणे, ओबीसीच्या न्याय चळवळ व हक्कासाठी वेळोवेळी निर्दर्शने व आंदोलने करणारे तसेच विदर्भातील ओबीसी चळवळीचे नेते प्राचार्या डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज शरद पवार व राष्ट्रवादी पक्षावर विश्वास करत पक्ष प्रवेश केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राचार्य डॉ.अशोक जिवतोडे याच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशने गडचिरोली,चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी समाज यांच्या पाठीशी खंभीर पने उभा राहणार आहे. राज्यात् ओबीसीचा नारा म्हणनारे भाजप सरकार च्या माजी दोन मंत्री असलेल्या चंद्रपुरातून एक एक कोहिनूर शरद पवारांनी राष्ट्रवादित खेचुन आनल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

यानाश कागार बभाजपा सरकारच्या दोन मंत्री असलेल्या बंजयराज माजी वित्तमंत्री सुधीर मुगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज मंत्री हंसराज अहीर असतांना डॉ जिवतोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशा मुळे राजकीय क्षेत्रात मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार यांनी विदर्भात ओबीसी चळवळीचा, सामाजिक कार्यात अग्रेसर, सुशिक्षित असलेला चहेरा आपल्या कड़े वळविल्याने आता चंद्रपुरातील राजकारण तापले आहे.या प्रवेशाला घेवून आता पासून 2024 मधील निवडणुकीचे गणित लावणे सुरु झाले आहे.त्याचे कारण म्हणजे शरद पवार यांचे राजकारण म्हटले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्राचार्य डॉ अशोक जोवतोड़े यांचा परिचय..
एम,कॉम,एम, ए, (अर्थशात्र) ,एम,फील,एम,एड,पीएच ,डी, ( शिक्षण) …..

ओबीसी समाजजागृती : – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून उत्कृष्ठ कार्य . दिल्ली , हैद्राबाद,नागपुर व इतर ठिकाणी ओबीसी चे राष्ट्रीय अधिवेशन आयोजनात मोठा सहभाग.

ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चाचे १६ डिसेंबर २०१८ रोजी सहभाग . व सर्व जिल्ह्यातून ओबीसी बंधूभगिनींची लाखोंच्या उपस्थिती होती . व या मोर्चामुळे राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली . अनेक ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावन्यात सर्वात समोर असणारे डॉ अशोक जीवतोड़े.

हे देखील वाचा  :

साडेपंधरा हजार पदांची भरतीप्रक्रिया लवकरच; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…

ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा बॅंकेचा महत्वाचा वाटा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे प्रतिपादन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.