Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बालाघाट मधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील जहाल महिला नक्षली ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

मध्यप्रदेशातील आणखी एक महिला नक्षली ठार.

शासनाने ठेवले होते आठ लाखांचे बक्षीस.

एक बारा बोअरची रायफल जप्त.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १२ डिसेंबर: मध्यप्रदेशातील सर्वाधिक नक्षल प्रभावित बालाघाट येथे काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत मध्यप्रदेशातील महिला नक्षलीसह शोभा उमेश गावडे गडचिरोली जिल्ह्यातील जहाल महिला नक्षली ठार झाल्याची घटना घडली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शोभा उमेश गावडे, वय ३० वर्ष असे ठार झालेल्या महिला नक्षलीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील मलाजखंड दलम एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. या अगोदर ती दर्रेकसा दलम सदस्य म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी तिच्याकडून एक बारा बोअरची रायफल जप्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील लांजी पोलीस किरनापूर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना पोलीस नक्षल चकमक झाली. पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. जवळपास एक तास ही चकमक चालली. यानंतर जंगलाचा फायदा घेऊन नक्षली पसार झाले. चकमक थांबल्यानंतर बालाघाट पोलिसांनी घटनास्थळावर शोधमोहीम राबविली असता दोन महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. बालाघाट पोलिसांनी यांची ओळख पटविली असता २४ वर्षाची सावित्री उर्फ आयते आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३० वर्ष शोभा उमेश गावडे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांवरही ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून अधिक साहित्य जप्त केलेले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.