Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘बोगस काम बंद करो इसका अंजाम मिलेगा’ अशी धमकी देत नक्षलवाद्यांनी झळकवले रस्त्यालगत बॅनर

Get real time updates directly on you device, subscribe now.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत नक्षलवाद्यांनी बॅनरच्या माध्यमातून दिला संदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ मार्च: जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पेंटिंपाका भागात नक्षली बॅनर्स आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिरोंचा ते अंकिसा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील 38 कोटींचे काम प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहेत.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेला पेंटीपाका परिसरात नक्षली बॅनर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॅनरवर ‘बोगस काम बंद करो इसका अंजाम मिलेगा’ असा उल्लेख करून भा.क.पा माओवादी असे लिहिले आहे. कामाचा दर्जा बरोबर नसल्याचे आक्षेप माओवाद्यांनी नोंदवून धमकी देणारे बॅनर लावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.