Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोलाकर्जी येथील पूर पीडितांनाजीवनावश्यक वस्तूं केले वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 25 जुलै :-  तालुक्यांतील खांदला ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या गोलाकर्जी येथील पुरपीडितांना माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले.अजय कंकडालवार यांनी पूर पीडित गावची भेट घेऊन नागरिकांना विचारपूस करत चर्चा केली. यादरम्यान शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले व पुराच्या पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने व सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नाही त्यामुळे उपासमारीची पाळी उद्भवली होती हि बाब लक्षात येताच कंकडालवार यांनी सदर गांवात पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेल्या वस्तूचे किट्स चे वाटप केले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सरपंचा सौ.लक्ष्मी श्रीरामवार, राजारामचे माजी सरपंचा सौ.जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी उपसरपंच, राजाराम ग्राम पंचायतचे सदस्या सौ.सपना तलांडे, प्रिया पोरतेट , माजी ग्राम पंचायत सदस्य सुधाकर आत्राम, माधव कूड़मेथे, वसंत सड़मेक, दिपक अर्का, नारायण चालुरकर, जितेंद्र पंजलवार, नरेंद्र गरगम, प्रमोद गोडसेलवार, रुपेश आत्राम, दिलीप आत्राम, तुळशीराम सड़मेक, बाजीराव आत्राम, गजरीबाई कोडापे, तुरुपतीबाई कोडापे, सुधीर बोडगेलवार, किशोर मडावी आदि उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा;अजित पवारांचं सरकारला पत्र

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिबट कातडे आणि खवल्या मांजर सिंपले ,विक्री प्रकरणी 7आरोपी वनविभागाच्या ताब्यात

Comments are closed.