Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील कोविड-१९ लसीकरण केंद्रात डाटा एंट्रीचे मनुष्य बळ वाढविण्याची गरज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३ मे: कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय सुट्टी व रविवार वगळता सर्वच लसीकरण केंद्रावर सर्वच दिवशी लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी गुरुवार ३० एप्रिलपासून जिल्ह्यात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात केवळ आतापर्यंत १५ टक्के लसीकरण झाले असून पुढे १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण  आयोजित केले आहे. आता दुर्गम भागातील लसीकरण केंद्रात केवळ १ व्यक्ती  डाटा एंट्रीकरतांना दिसून येत असून डाटा एंट्री करण्यास उशीर होत असल्याने लसीकरण पुरेसे झाले नाही. असे दिसत आहे, त्यामुळे प्रत्येक केंद्रात डाटा एंट्रीकरिता किमान १० मनुष्यबळ उपब्धतेसाठी आवश्यक आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी ७३ केंद्र उपलब्ध आहेत त्यात ७२ शासकीय आणि १ खासगी लसीकरण केंद्राचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९४७४१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यापैकी पहिला डोस ७७१४७ नागरिकांना देण्यात आला आहे तर दुसरा डोस १७५९४ नागरिकांना देण्यात आला आहे. अशी माहिती कोविन ऍपच्या माध्यमातून देण्यात आली आहे.  

त्यामुळे आता १ मे पासून १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाची नोंदणी करतांना मनुष्यबळ अभावी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा तान येणार आहे. त्यामुळे कोविड-१९ लसीकरण केंद्रावर डाटा एंट्री मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. अशी मागणी होत आहे.    

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.