Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निशाताई बिडवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क :-पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बिडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी ग्रॅज्युएट फोरमचे पदाधिकारी सुजाता कुबडे, मोनाली कुबडे, गायत्री बोरकर, अशोक एंडे, प्रभुराज पाटील, प्राचार्य बसवराज मठदेवरू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निशाताई बिडवे म्हणाल्या, “पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ग्रॅज्युएट फोरमच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. विधानपरिषदेत जाऊन पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.