Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्थलांतरितांचा प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ना. डॅा. नीलम गोऱ्हे यांचे निवेदन

पुणे डेस्क, दि. २७ मार्च: पुण्यामध्ये कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता जर का लॉकडाऊन प्रमाणे निर्बंध टाकण्यात येणार असतील तर असंघटित मजूर त्यांचे मालक त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवा व सामाजिक संघटनांच्या माहिती प्रसारणासाठी जिल्हा स्तरावर मनपा स्तरावर व विभागीय आयुक्त स्तरावर ऑनलाईन काम करेल अशी समिती जिल्ह्यात नेमावी. त्यांना संपर्क साधने समन्वय करणे माहिती उपलब्ध करणे व मदत करणे अशी जबाबदारी या समितीला द्यावी. या समितीतील एकेक अधिकारी या कामासाठी प्राधिकृत करावेत. यासाठी आपण जिल्हाधिकारी पुणे यांना आदेश द्यावेत असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  ना. उद्धवजी ठाकरे तसेच ना. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

    कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत आढावा बैठक आज ना. अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

   जिल्हाधिकारी पुणे यांना इस्पितळे उपलब्धतेबाबत Dash board आता चालू आहे का? असल्यास लिंक शेअर करायला सांगावे. तसेच vaccine च्या दुसऱ्या डोस ला ४२ दिवसांची मुदत दिली असेल तर सर्व तारखांचे नवीन वेळापत्रक सर्व vaccine  केंद्रात उपलब्ध करून, त्यांची केंद्रीभूत व विकेंद्रित माहितीची दूरध्वनी सेवा उपलब्ध करून द्यावी, याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश व्हावेत असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्राद्वारे विनंती केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.