Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शौचालयाची टाकी साफ करताना तिघांचा नव्हे तर चौघांचा मृत्यू…!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली आहे. हि घटना बुधवारी (ता. ०२ ) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर), रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे, (वय- ४५ ) घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे राजेंद्र जयसिंग काळभोर यांची जय मल्हार कृपा नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुरु होते. टाकी साफ करताना त्यांच्यापैकी एकजण व्यक्ती टाकीत पाईप टाकताना तोल जावून टाकीत पडला. सदर पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीपण या टाकीत पडला,. यावेळी टाकीत पडलेल्या दोघांना वाचविताना वरील दोघेही टाकीत पडले. आणि यामध्येच या चौघांचाही मूत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, प्रियांका चौगुले, विकास जगदाळे, अजिंक्य जोजारे, अमित साळुंके व वाघोली फायर स्टेशनचे उप अग्निशामक अधिकारी विजय महाजन, वाहन चालक नितीन माने, फायरमन मयुर गोसावी, चेतन खमसे, विकास पालवे, मुस्ताक तडवी, अक्षय नेवसे, ओम पाटील, प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शौचालयाच्या टाकीच्या बाहेर काढले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही – जयंत पाटील

गडचिरोलीतील इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी या विषयाच्या गोंडी व माडीया भाषेतील पाठयपुस्तकांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन

एकल केंद्र, गडचिरोली गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.