Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

6 कोटींचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी ‘हिडमा’ अखेर अटकेत

ओडिशा पोलिसांची शौर्यगाथा: जंगलातील संयुक्त ऑपरेशन यशस्वी; नक्षल नेटवर्कला मोठा धक्का.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरापूट (ओडिशा) | दि. २९ मे : देशभरातील नक्षलप्रभावित राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या व्यापक नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. तब्बल 6 कोटींचं बक्षीस असलेल्या, ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी कुंजाम हिडमा उर्फ मोहन याला ओडिशा पोलिस आणि डिस्ट्रिक्ट व्हॉलंटरी फोर्स (DVF) यांनी कोरापूट जिल्ह्यातील अतिदुर्गम जंगल परिसरातून ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई देशातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हिडमा: नक्षल चळवळीतील ‘मास्टरमाइंड’ अखेर जेरबंद..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हिडमा हा छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि आंध्रप्रदेशातील नक्षल नेटवर्कचा मुख्य सूत्रधार मानला जात होता. त्याच्यावर केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी मिळून तब्बल ₹6 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.

हिडमाचं नाव गडचिरोली, गोंदिया, बस्तर आणि कोरापूट परिसरात घडलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये आलेलं असून, तो CRPF व पोलिसांवरील भीषण हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जात होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जंगलात यशस्वी सर्जिकल ऑपरेशन – एकूण शस्त्रसाठा हस्तगत..

हिडमा याला अटक करण्यासाठी कोरापूट जिल्ह्यातील हाइपारीगुडा पोलीस ठाणे हद्दीतील पेटगुडा जंगलात विशेष ऑपरेशन राबवण्यात आलं. अत्यंत गोपनीयतेने राबवलेल्या या मोहिमेमध्ये खालील धोकादायक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला:

AK-47 रायफल – 1

जिवंत काडतुसे – 35

डेटोनेटर – 117

गनपावडर आणि स्पोटकं वायरलेस रेडिओ उपकरणंचाकू आणि इतर नक्षली साहित्य.या संपूर्ण कारवाईत एकही गोळी न झाडता हिडमाला जेरबंद करण्यात यश आलं, ही विशेष कौतुकास्पद बाब आहे..

नक्षल चळवळीच्या पायात ‘हिडमा’ अडथळा – आता संधी परिवर्तनाची..

ही अटक केवळ एका नक्षलवाद्याची नसून, अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या हिंसाचाराच्या यंत्रणेला मोठा हादरा आहे. हिडमा हा नक्षल विचारधारेचा प्रमुख प्रचारक असून, अन्य तरुणांना भरती करण्यासाठी व मानसिक दूषिती घडवण्यासाठी तो सक्रिय होता. त्याच्या अटकेमुळे आता त्या भागातील तरुण पिढीला शांतता, विकास आणि समावेशकतेकडे वळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कठोर भूमिका फळाला आली…

नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या सरकारच्या धोरणाला हे यश मैलाचा दगड ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षल भागांमध्ये स्पेशल ऑपरेशन सुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचीच परिणामकारक अंमलबजावणी ही अटक दर्शवते.

काय पुढे…?

सुरक्षा दलांकडून या यशानंतर संपूर्ण सीमावर्ती जंगल पट्ट्यांमध्ये शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. हिडमासारखे इतर ‘हाय वैल्यू टार्गेट्स’ देखील रडारवर आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे अचूक कारवाया, स्थानिकांचा समावेश, तांत्रिक साधनांचा वापर आणि केंद्र व राज्य यंत्रणांमधील समन्वय हे या यशाचं गमक असल्याचं सुरक्षा दलांनी नमूद केलं आहे.

नव्या सुरक्षेचा सूर..

हिडमा याच्यासारख्या नक्षलवाद्यांच्या अटकेनंतर स्थानिकांमध्येही समाधानाची भावना दिसून आली आहे. नक्षलवाद्यांच्या छायेत दबलेल्या कोरापूट, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई लोकशाही, शांतता आणि विकासाच्या दिशेने एक पाऊल अधिक आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.