Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळविण्यासाठी भाजपा रस्त्यावर.

  • आंदोलनाला ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 26 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा डाव रचलेला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एम्पेरियल डाटा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर ही 15 महिन्याचा कालावधी लोटूनही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने डाटा सादर केलेला नाही. याचा परिणाम ओबीसी समाजावर झाला असून त्यांचे राजकीय आरक्षण बंद झालेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्यासाठी व या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येत असून ओबीसींच्या हक्काचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी केले. ओबीसींच्या आंदोलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येथील इंदिरा गांधी चौकात ओबीसींच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजी व धरणे आंदोलन करण्यात आले. तदनंतर चौकातील चारही रस्त्यावर चक्का जाम करून अर्धा तास वाहतूक थांबविण्यात आली त्यानंतर खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुराव कोहळे,  जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा महिला आघाडी च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, जि.प. च्या समाजकल्याण सभापती रंजीताताई कोडाप, आदिवासी मोर्चा च्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, न.पं. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश महाजन, श्रीकांत पतरंगे गडचिरोली चे तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, तालुका महामंत्री कोलते, तालुका महामंत्री दुर्गाताई काटवे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवर, महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हा, तालुका व शहराचे पदाधिकारी, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन  

 

Comments are closed.