Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आलापल्ली वनविभागात कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून “संकल्प दिवस”साजरा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलापल्ली वनविभागात “संकल्प दिवस” म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलतांना राहुलसिह टोलिया उप वनसंरक्षक यांनी म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो . डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने पूर्ण केले आहे.

अल्लापाली दि, ६ डिसेंबर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ‘संकल्प दिवस’ म्हणुन आलापल्ली वनविभागातील कार्यालयात साजरा करण्यात आला. शासकीय वन कर्मचारी सह.संस्थेच्या कार्यालयात मा. राहुल सिंह टोलिया उपवनसंरक्षक आलापल्ली वनविभाग, आलापल्ली यांचे अध्यक्षतेखाली श्री योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि संस्थेचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी मा. राहुल सिंह टोलिया उपवनसंरक्षक आलापल्ली वनविभाग आलापल्ली यांनी डॉ. बाबासाहेबाच्या जिवनावर प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलापल्ली वनविभागात “संकल्प दिवस” म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलतांना राहुलसिंह टोलिया उप वनसंरक्षक यांनी म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो . डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानव कल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने पूर्ण केले आहे. ही व्यवस्था या देशात अबाधित पणे टिकुन राहावी या साठी आप सर्वानी प्रयत्न केले पाहीजे हिच बाबासाहेबांना खरी श्रदांजर्ली असेल असे प्रतिपादन मा. राहुल सिंह टोलिया भावसे यांनी केले. प्रस्तावना, संचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष श्री उमाजी गोवर्धन यांनी केले. या कार्यक्रमास वनविभागातील कर्मचा-यासह गावातील प्रतिष्ठीत नागरी उपस्थित होते.

तसेच आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रच्या आलापल्ली स्थित कार्यालयात दोन्ही ठिकाणी श्री योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व उमाजी गोवर्धन यांचे प्रमुख उपस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराजंली वाहण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी या “संकल्पदिनी” स्वातंत्र समता, बंधुत्व आणि न्यायाची व्यवस्था या देशात शेवटपर्यंत टिकुन राहील, या करीता आपण सर्वानी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचे योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रतिपादन केले. या दोन्ही कार्यक्रमासह तेथील कर्मचारी व स्थानिक प्रतिष्ठीत उपस्थित होते.
हे देखील वाचा,

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.