Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रांगी येथे दोन निलगायच्या झटापटीत एक नीलगाय ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा, दि. २० मार्च: धानोरा तालुक्यातील रांगी वन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रम शाळेमागील परिसरातील कंपाउंड क्रमांक ६०६ मध्ये दोन निलगायची आपसात टक्कर होऊन एक नीलगाय जागीच ठार झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

रांगी वनविभागा अंतर्गत येत असलेल्या शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळेच्या मागील परिसरातील कंपाउंड क्रमांक ६०६ मध्ये रात्रीच्या सुमारास दोन नीलगायची आपसात टक्कर झाली. त्या टकरीत एक नीलगाय जागीच ठार झाली असल्याची माहिती कार्यालयाला मिळाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येथील क्षेत्र सहाय्यक यांनी याची माहिती वरिष्ठ ला दिली त्यानंतर धानोरा येथील वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या चारचाकी वाहनाने ठार झालेल्या निल गायीला रांगी येथे आणण्यात आले. सदर नीलगाय अंदाजे चार वर्षाची असून ती गरोदर होती.

ठार झालेल्या निलगाई वरती डॉक्टर डांगे यांनी पीएम करून रांगी येथील मोठ्या तलावाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आर. एफ.ओ. मस्के मॅडम, क्षेत्र सहाय्यक बळवंत येवले, वनरक्षक जांभोर, ढोरे कुडवले आणि वनमजुर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.