Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

16 ऑक्टोबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 5 ऑक्टोंबर :जिल्हा परिषद अंतर्गत गट –क या संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती परिक्षा दिनांक 07, 08, 10 व 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील गॅलक्सी इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी, कॅम्प एरिया, माता मंदिर जवळ, धानोरा रोड, गडचिरोली या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.

सर्व केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी संजय मिना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परिक्षा केंद्राच्या 200 मिटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स केंद्र, एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता, येणार नाही.

परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी. सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या आदेशात नमुद आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.