Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन

15 मार्च ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि.1 मार्च  : भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5 ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता अग्निवीर रॅली आयोजीत करण्यात आली आहे.

भरतीस इच्छुक उमेदवारांनी सैन्य भरतीच्या अटी, नियम, पात्रता व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच स्वतःचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नंतर मिळणाऱ्या हॉल तिकीट शिवाय कोणत्याही उमेदवारास सैन्य भरतीच्या मैदानात प्रवेश मिळणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2558020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी या संधीचा परिपूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.