Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गडचिरोली पोलीस रक्तदान शिबिराचे आयोजन

पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा येथे झालेल्या शिबिरात एकुण 560 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 14 जुन – 14 जुन हा दिवस जगभरात रक्त आणि रक्तांची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणुन साजरा येते. गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडु आलाम सभागृहामध्ये तसेच उप-मुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवुन “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकुण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी रक्तदानाचे महत्व पटवून सांगीतले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हे तर रक्तदाता म्हणुन सहभागी होवुन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग होवुन एखादया रुग्णाचा जीव वाचविल्याचे व मदत केल्याचे आपणास समाधान मिळते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उप-मुख्यालय, प्राणहिता येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये अहेरी, भामरागड, एटापल्ली, हेडरी भागातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सिरोंचा, जिमलगट्टा, असरअली, पातागुडम भागातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख , तसेच सीआरपीएफचे डेप्युटी कमांडण्ट 192 बटा. शिव महेन्द्र सिंग, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ. सतिशकुमार एम. सोळंके व मुख्य वैदयकिय अधिकारी पोलीस रुग्णालय गडचिरोली सुनिल मडावी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपुर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.