Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन

- फिनिक्स साहित्य मंचाचा पुढाकार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.

शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने २० मे रोजी ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित ‘संदेश कोरोना लसिकरणाचा’ या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व माह्यी परदेश वारीचे लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेत होईल. सुत्रसंचालन कवी नरेशकुमार बोरीकर तर आभार कवी सुरेंद्र इंगळे करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन गोंडपिपरीचे सहा.गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे आयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी धर्मेंद्र कन्नाके यांनी केले आहे.

कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

GOOD NEWS: DRDO आज लॉन्च करणार 2-डीजी अँटी कोविड औषध

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.