Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमची मन जुळलेली फक्त…:- मनसे आमदार राजू पाटील

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 कल्याण 24 ऑक्टोबर :- राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे शिंदें गट-भाजप आणि मनसे एकत्र आल्यास कुणाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही भाजप-शिंदे गट-मनसे महायुतीबाबत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत मोठं वक्तव्य केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी सांगितले की आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल. महायुतीबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज सकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची भेट घेतली. त्यापूर्वी डोंबिवलीमधील प्रसिद्ध असलेले श्री गणेश मंदिर संस्थान येथे कुटुंबियांसोबत जाऊन बाप्पाचा आशीर्वाद त्यांनी घेतला.

यावेळी पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या शाखेत भेट दिली हा प्रश्न विचारला असता पाटील यांनी सांगितले की, शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते. शिवतीर्थावर राज साहेब हे गेल्या दहा वर्षापासून दीपोत्सवाचा कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे त्यांना आमंत्रित केलं होतं. शिवतीर्थावर जशी रोषणाई करण्यात आली तशीच रोषणाई आम्ही फडके रोडवर करून एक झलक दाखवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे असे कार्यक्रम होत असताना एकमेकांच्या गाठीभेटी होतात. दिवाळीच्या किंवा अशा चांगल्या सणांच्यावेळी कुणी आडकाठी करत नाही. आपली संस्कृती पण नाही. काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी या भागात कार्यक्रम ठेवलेला त्या भागामध्ये आमचं मध्यवर्ती कार्यालय आहे. राजकारणात विरोधात असलो तरी आम्ही दुश्मन नाही. वैयक्तिक असं काही नसतं एकमेकाला चांगले शुभेच्छा नेहमी देत असतो, असं राजू पाटील यांनी म्हटलं.

महायुतीबाबत बोलतांना त्यांनी म्हटलं की, युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. त्यांनी आदेश दिले आहेत की निवडणुका स्वबळावर लढावं. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. साहेबांनी सांगितलं युती करायची ती देखील करायला आम्ही तयार आहोत. मात्र एक नक्की आमचे सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. राजू पाटल्यांच्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.