Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुरखळा येथील कोरोना बाधीत चव्हाण यांना लावले ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन

खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून ऑक्सिजन ची सोय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: खा. अशोक नेते यांचे जनसंपर्क कार्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन उपलब्ध आहेत. नमो कोविड केअर सेवेमार्फत भारतीय जनता पक्षाच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कोविड रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. काल 18 मे रोजी आवाहन करण्यात आले होते. आज 19 मे रोजी गडचिरोली तालुक्यातील मुरखळा येथील सुरेश चव्हाण या कोविड बाधीत व्यक्तीला ऑक्सिजन ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले असता नगर परिषद चे उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर यांनी ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन उपलब्ध करून त्यांना लावून दिली. यावेळी शहर महामंत्री विनोद देवोजवार, श्यामजी वाढई उपस्थित होते.

ज्या गरजू नागरिकांना किंवा कोविड बाधीत मात्र होम आयसोलेशन मध्ये असलेल्या नागरिकांना ऑक्सिजन लागत असल्यास अनिल कुणघाडकर, विनोद देवोजवर याच्याशी संपर्क साधावा. व या निःशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  :

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 मृत्यूसह 243 नवीन कोरोना बाधित तर 158 कोरोनामुक्त

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अरबी समुद्रात ‘बार्ज P- 305’ वरील रेस्क्यू ऑपरेशन थरार सुरूच

 

Comments are closed.