Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवतीला विवस्त्र करून पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाकडून मुलीचा शारीरिक छळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • पीडितेच्या आई आणि नातलगाच्या मदतीने दोघांनी अघोरी कृत्य करत वर्षभरापासून पीडितेचे शोषण केलं.
  • पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक पसार.
  • दोघांना केली पोलिसांनी अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. ८ एप्रिल:  जादू टोण्यातून पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाने युवतीला विवस्त्र करीत वारंवार अघोरी कृत्य केल्याचा प्रकार वर्ध्यात समोर आला आहे. या प्रकारात पीडितेची आई आणि एका नातलागाची साथ देखील या मांत्रिकाला मिळाली आहे.  पीडितेचे अघोरी कृत्यातून वर्षभरापासून शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर, किशोर सुपारे असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडितेच्या आई व काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर हा व्यक्ती आला. त्याचाच मित्र असलेल्या मांत्रिकाने पैशांचा पावसाची कल्पना मांडली. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषाला पीडितेची आई आणि काका बळी पडले आहेत.  पीडितेला भूलथापा देत ऐरणगाव, नांदगाव शेत शिवारातील निर्जनस्थळी नेवुन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार पीडितेसोबत केला गेला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला होता. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला तयार करून वारंवार असे अनेक प्रयोग केले गेले. 

त्रासाला कंटाळून पीडित तरुणी बेपत्ता झाली. पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.