पोलीसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवने व्यावसायिकाला पडले महाग
गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
डोंबिवली, 01 नोव्हेंबर :- सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मिडियावर व्हायरल करण्याचे वेड सर्वांना लागले आहे. या रिल्स बनवतांना स्वतची प्रसिध्दी करण्याकरीता काहीही केले जाते. अशीच एक बातमी समोर येत आहे. डोंबिवलीतील व्यावसायिकांने चक्क पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या खुर्चीवर बसून इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी रील बनवून व्हायरल केली आहे. या व्यावसायिकांचे नाव सुरेंद्र पाटील असे असून तो डोंबिवलीत राहतो. मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिसांच्या खुर्चीवर बसून दहशत माजवणाऱ्या या इंस्टास्टारने स्वतःच्या गाडीवरदेखील पोलिसांचा लोगो वापरला आहे. तसेच त्याने आणि त्याच्या भावाने रामायण मालिकेत लव आणि कुशाची भूमिका साकारली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटील चे इन्स्टाग्रामला देखील हजारो फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामला त्याने आत्तापर्यंत सुमारे 700 च्या वर रील बनवले आहेत. त्यामध्ये त्याने पैसे, तलवार, बंदूक आदी गोष्टींचा उघडपणे गैरवापर केला आहे. दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्यात एका खटल्याचा तो फिर्यादी असून त्याला एका भोंदू बाबाने 50 कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून 56 लाख रुपयांना गंडा घातला होता. त्यानंतर त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणातील 20 लाख रुपये पोलिसांनी भोंदू बाबांकडून हस्तगत केले होते. हे पैसे परत देण्यासाठी त्याला मानपाडा पोलिसांनी फोन करून बोलवून घेतले.
याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यासंदर्भातील काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कक्षेत गेले. तोपर्यंत पाटील यांनी अधिकाऱ्याच्या कक्षेत कोणीच नसल्याचा फायदा घेतला. त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याचे धाडस करत एका अज्ञात व्यक्तीकडून व्हीडिओ शूट करून घेतला. त्यांनतर त्या व्हिडिओच्या रील बनवत इन्स्टाग्रामला प्रसारित केला. हे रील व्हारल होताच पोलिसानी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केले. त्याच्यावर जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन करणे तसेच परवानाधारक शस्त्र हातामध्ये घेऊन निष्काळजीपणे वापर करून शस्त्र परवान्याच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध गोष्टींसाठी अटक केली आहे.
महाराष्ट्र पोलिसांचा लोगोचा वापर
चारचाकी वाहनावर त्याने महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरल्याचेही समोर आले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी इतके दिवस त्याच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.