Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचा वनविभागात शिकारी टोळी सक्रिय

पेंटिपाका जंगल परिसरात आढळून आला अस्वलाचा मृतदेह, शिकारीस वनप्रशासन बेजबाबदार कारणीभुत, सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 29, ऑक्टोबर :- सिरोंचा वनविभागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वृक्षांची अवैध कत्तल करून तस्करी केली जात असून गौणखनिजांचे अवैध उत्खनन होत आहे. मात्र यावर अंकुश घालण्यात सिरोंचा वनविभागाला अपयश येत असल्याने वन्यप्रेमी व पर्यावरणवाद्यांमध्ये प्रचंड रोष व्याप्त आहे. अशातच तालुक्यातील पेंटिपाका जंगल परिसरात गुरूवारी अस्वलाचा मृतदेह आढळून आल्याने सिरोंचा वनविभागात शिकारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. गुरूवारी अस्वलाचा मृतदेह मिळूनही आज शनिवार पर्यंत वनविभागाद्वारा कोणतीही कार्रवाई झाली नसल्याने या प्रकरणात वनविभागाची अनास्था दिसून येत आहे. याला सर्वस्वी वनप्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभुत असल्याचा आरोप करत दोषी वनाधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कार्रवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सिरोंचा वनविभागातील जंगल क्षेत्रात वनजमिनीवर अतिक्रमण करणे, मौल्यवान सागवानाची तस्करी करणे, यासाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरु आहे. वनाधिकारी व वनकर्मचा-यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. यामुळे लाखों रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूलही बुडाला आहे. सिरोंचा वनविभागांतर्गत कार्यरत वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून कर्तव्य बजावित नसल्याने वनतस्करांची मुजोरी वाढली आहे. याप्रकरणी संबंधित दोषी वन कर्मचा-यांवर कारवाई करण्यासंदर्भात सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपूरावा करण्यात आला. मात्र सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वृक्षतोडीस वनतस्करीचे प्रकार सुरुच आहेत. अशातच आरडा नियत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पेंटिपाका-पाटीपोचम्मा जंगल रस्त्यालगत अस्वलाचा मृतदेह आढळून आला. यात अस्वलाच्या चारही पायांचे पंज व लिंग गायब असल्याने हा प्रकार शिकारीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे सिरोंचा वनविभागात आता शिकार करणारी टोळीही सक्रिय झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार सर्रास होत असतांना वनसंपदेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले वनविभाग दिवाळीच्या सुट्यात गर्क होते काय? असाही प्रश्न ताटीकोंडावार यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड, गौणखनिजाचे उत्खनन यासह अस्वल शिकार प्रकरणाकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन संबंधित दोषी वनाधिकारी, वनकर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा नागपूर वनभवनातील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.