Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोपर्शी जंगलातील 48 तासांच्या तुफानी अभियानात पोलिसांनी केला चार माओवाद्यांना ठार

चार माओवाद्यावर होते 14 लाखांचे बक्षीस.. गडचिरोली पोलीसाची मोठी कामगिरी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या माओवादविरोधी तुफानी अभियानात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफच्या जवानांनी मोठा पराक्रम गाजवला. झालेल्या रक्तरंजित चकमकीत पीपीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह चार जहाल माओवादी ठार झाले. यांच्यावर एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. घटनास्थळावरून एस.एल.आर., दोन इन्सास व एक .303 रायफल, 92 जिवंत काडतुसे आणि तीन वॉकीटॉकी जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे 25 ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सी-60 च्या 20 तुकड्या आणि सिआरपीएफ क्यू.ए.टी.च्या दोन तुकड्या कोपर्शी जंगलात दाखल झाल्या. अवघड भूभाग आणि सततच्या पावसाला तोंड देत जवानांनी सलग दोन दिवस शोधमोहीम राबवली. 27 ऑगस्टला सकाळी माओवादी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू करत जवानांना ठार मारण्याचा व शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र माओवादी आणखी आक्रमक झाले. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात आठ तासांच्या चकमकीनंतर चार माओवादी ठार झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख

1. मालु पदा (41, छत्तीसगड) – पीपीसीएम, कंपनी क्र. 10 दलम, बक्षीस 6 लाख, 8 गंभीर गुन्हे दाखल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2. क्रांती ऊर्फ जमुना हलामी (32, गडचिरोली) – कंपनी क्र. 10 सदस्य, बक्षीस 4 लाख, 27 गुन्हे दाखल.

3. ज्योती कुंजाम (27, छत्तीसगड) – अहेरी दलम सदस्य, बक्षीस 2 लाख, 8 गुन्हे दाखल.

4. मंगी मडकाम (22, छत्तीसगड) – गट्टा दलम सदस्य, बक्षीस 2 लाख, 3 गुन्हे दाखल.

या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, परिक्षेत्रीय उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सिआरपीएफ उप-महानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा यांनी केले. तर प्रत्यक्ष नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांनी केले. सी-60 प्राणहिता प्रभारी अधिकारी सपोनि. राहुल देवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे सन 2021 पासून आतापर्यंत 91 माओवादी ठार, 128 अटकेत आणि 75 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे अभिनंदन केले. तसेच माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत, गडचिरोलीत माओवादविरोधी मोहिम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.