Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेच्या निरीक्षणासाठी पोलीस ऑब्झर्वर अनुपम शर्मा रूजू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि. 31: विधानसभा निवडणुकीसाठी 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था निरीक्षणासाठी पोलीस ऑब्झर्वर म्हणुन श्री. अनुपम शर्मा (भा.पो.से.) रूजू झाले आहे.

श्री. शर्मा हे आय पी एस मेस न्यू रेस्ट होऊस अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालय या ठिकाणी वास्तव्यास असुन विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी रेस्ट हाऊस येथे सकाळी 11 ते दुपारी 01 वाजेपर्यंत व सायंकाळी 04 ते 06 यावेळेत त्यांची भेट घेवुन तक्रार करावी अथवा त्यांचा मोबाईल नंबर 9404306035 यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.