Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

७० हजारांचा दारू साठा नष्ट करण्यात पोलिसांना यश

  • अमरावती शहरा जवळील पारधी बेड्यावर फ्रेजरपुरा पोलिसांनी आज धाड टाकून १० ड्रम मोहाचा सडा व ५ ड्रम गावठी दारू असा जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १९ एप्रिल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे बियर बार आणि वाईन शॉपी ला फक्त पार्सल सेवाच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. असं असलं तरी अमरावती शहरानजीक असलेल्या राजुरा येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारू तयार केले जात असल्याची गुप्त माहिती ही पोलिसांना मिळाली होती. त्याच अनुषंगाने फ्रेजरपुरा पोलिसांनी आज धाड टाकून १० ड्रम मोहाचा सडा व ५ ड्रम गावठी दारू असा जवळपास ७० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तब्बल दोन तास ही मोहीम सुरु होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमरावती शहराला लागूनच असलेल्या राजुरा येथे पारधी बेडा आहे. या बेड्यावर मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार केली जाते. त्यानंतर ती दारु शहरातील विविध भागात आणून विकली जाते अशी माहिती पोलिसांना होती. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजता पासून ते तीन वाजेपर्यंत या बेड्यावर पोलिसांनी धाडसत्र राबवले यामध्ये रनिंग भट्टी लावलेले पाच ड्रम नष्ट केले तर दहा ड्रम मोहाने भरलेले आढळून आले होते. दरम्यान पोलिसांनी या केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.