Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 24 जून : प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर मार्फत दिनांक 28 जून 2021 रोजी चंद्रपूर कार्यालय, चंद्रपूर येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या डाक अदालतीमध्ये चांदा विभागाच्या डाक सेवेमध्ये सेवाशी संबंधीत तक्रारीवर ज्यांच्या निपटारा सहा हप्त्याच्या कालावधीमध्ये केला गेला नसेल अशा तक्रारीवर डाक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काउंटर सेवा, बचत बैंक आणि मनिऑर्डरचे भूगतान न झाल्याबाबत अशा विविध सेवांचा समावेश आहे.
डाक अदालतीमध्ये तक्रार पत्रावर त्या अधिकाऱ्याचे/ कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, तसेच कार्यालयाचे नाव व दिनांक असणे आवश्यक आहे ज्याच्याकडे आपण मुळ अर्ज पाठविला होता. इच्छुक डाक सेवा मधील तक्रारींचे दोन प्रतीत प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर-442401 या पत्यावर, दि. 25 जून 2021 पर्यत पाठविण्यात यावे. नंतर येणाऱ्या तक्रारींचे विचार करण्यात येणार नाही असे प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.